माजी सैनिक, वीरनारी, पाल्य यांच्याकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण

 छत्रपती संभाजीनगर,दि.१८(जिमाका)- जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा वीर नारी पाल्याकरीता कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी https://bit.ly/skillcourses या संकेतस्थळावर १३५ अभ्यासक्रमांची यादी प्रकाशीत करण्यात आली आहे. ती याप्रमाणे- कृषी प्रशिक्षण – ६४, वेशभुषा – ९, यांत्रिकी – ७, सौंदर्योपचार – २१, फर्निचर– ७, रंग व लेपन – ४, सुरक्षा सेवा -२,  क्रीडा – १४, पर्यटन व आतिथ्य  – ७ या प्रशिक्षणांसाठी माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरनारी, पाल्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०२४०-२३७०३१३ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा,असे कळविण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा