मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचा कालावधी आता ११ महिन्यांचा
छत्रपती संभाजीनगर,दि.२०(जिमाका)- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्याकरीता राज्य शासनाने सुरु केलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी आता ६ महिन्यांवरुन ११ महिने करण्यास शासनाने मान्यता दिली आहे,अशी माहिती सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सुरेश वराडे यांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत ज्या उमेदवारांचा ६ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला आहे. अशा उमेदवारांनी पुढील ५ महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत पुन:श्च दि.३० एप्रिल पर्यंत रुजू व्हावे व एकूण ११ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment