आयकर विवरण सुधारणा करण्यास ३१ मार्चपर्यंत मुदत

 छत्रपती संभाजीनगर, दि.२५(जिमाका)- आयकर विवरणपत्रांमध्ये दि.१ एप्रिल २०२५ पासून, आर्थिक वर्षांच्या सहा वर्षांनंतर कोणत्याही सुधारणा स्वीकारल्या जाणार नाहीत. त्यामुळ२००७-०८ते २०१८-१९ या आर्थिक वर्षांतील कर विवरणपत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी दि.३१ मार्च पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. वरिष्ठ कोषागार अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक करदात्यांनी त्यांच्या कर विवरणपत्रांमध्ये काही त्रुटी ठेवल्या आहेत. या त्रुटींमुळे आयकर विभागाच्या TRACES पोर्टलवर थकबाकीची मागणी दिसत आहे.या समस्येवर उपाय म्हणून, करदात्यांनी TRACES पोर्टलवर सुधारणा विधाने दाखल करून त्यांच्या थकबाकीची मागणी शून्य करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या करदात्यांच्या कर विवरणपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत, त्यांनी दि.३१ मार्च  पूर्वी आवश्यक ती सुधारणा करावी,असे आवाहन सहाय्यक संचालक निवृत्तीवेतन विभागाच्या श्रीमती सुषमा बुरकुले यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा