‘पिंजरा मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञानाबाबत’ पुणे येथे कार्यशाळा
छत्रपती संभाजीनगर, दि.24 (जिमाका)- पिंजरा मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञान किफायतीशीर होण्यासाठी पिंजरे स्थापति केल्यानंतर प्रत्यक्ष मत्स्यबीज संचयनापूर्वी पूर्वतयारी बरोबरच मत्स्यसंवर्धानामध्ये खाद्य व्यवस्थापनासह माशांचे आरोग्य व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने करणे अत्यंत आवश्यक असते. उत्पादनाबरोबर विक्री व्यवस्थापन देखील महत्त्वाचे आहे. पिंजरा मत्स्यसंवर्धानाबाबत सखोल मार्गदर्शन करण्याची बाब विचारात घेऊन मत्स्यव्यवसाय विभाग, पुणे यांचेकडून पिंजरा मत्स्यसंवर्धनाबाबत सखोल प्रशिक्षण कार्यशाळा दि.25 ते 27 मार्च 2025 रोजी कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळेमध्ये
शास्त्रोक्त पिंजरा पिंजरा मत्स्यसंवर्धनाबाबत महत्वाचे बारकावे सखोल पद्धतीने
समजावून घेण्याच्या दृष्टीने शास्त्रज्ञ, प्राध्यापक, तज्ज्ञ अधिकारी व अनुभवी
पिंजरासंवर्धक यांचेमार्फत सविस्तर मार्गदर्शन तसेच पिंजरा पिंजरा मत्स्यसंवर्धन
प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष भेटीद्वारे प्रात्याक्षिक दाखविण्यात येणार आहे. या
प्रशिक्षणामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर,
बीड व परभणी या 8 जिल्ह्यामध्ये केज प्रकल्प असलेल्या प्रधानमंत्री पिंजरा
मत्स्यसंपदा अंतर्गत Cage Culture योजनेतील सर्व पिंजरा पिंजरा मत्स्यसंवर्धन
प्रकल्पधारक तसेच पिंजरा पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प मंजूर झालेल्या लाभार्थीनी
जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पुणे व छत्रपती संभाजीनगर
विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय विजय शिखरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी
9423758824,9881600951, व 8208413011 या क्रमांकाव संपर्क करण्याचे आवाहन करण्यात
आले आहे.
00000
Comments
Post a Comment