छत्रपती संभाजीनगर तालुका;सरपंचपदाचे आरक्षण सोडत बुधवारी(दि.९)
छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका)-ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणाची तारीख बुधवार दि. ९ एप्रिल २०२५ निश्चित करण्यात आली आहे. मौलाना आझाद संशोधन केंद्र, एन-१०, सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे बुधवार दि.९ रोजी
सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत होणार आहे. ही आरक्षण सोडत एप्रिल २०२५ ते मार्च २०३० या पाच वर्षांसाठी एकूण ११५ ग्रामपंचायतीसाठी होणार आहे. सरपंच आणि
उपसरपंच निवडणूक नियम १९६४ च्या नियम (३) (४) नुसार हे आरक्षण काढण्यात येणार आहे.
तालुक्यातील सर्व नागरिकांनी या जाहीर प्रकटनाद्वारे सरपंच पदाचे आरक्षण काढण्यासाठी
वरील ठिकाणी, तारखेला आणि ठरलेल्या वेळेत सभागृहात उपस्थित राहावे. असे आवाहन तहसीलदार
छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment