सैन्यदल भरती ऑनलाइन सामाईक प्रवेश परीक्षेसाठी दि.२५पर्यंत नोंदणी मुदत

 छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका):- सैन्य भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (CEE) व भरती रॅली २०२५-२६ साठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आता दि.२५ एप्रिल २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही परीक्षा भारतीय सैन्यभरतीच्या संदर्भात असून, उमेदवारांच्या मागणीनुसार व त्यांच्या सोयीसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात सुरुवातीची अधिसूचना १२ मार्च २०२५ रोजी www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार अर्ज करण्यासाठीची विंडो १० एप्रिलपर्यंत खुली होती. परंतु उमेदवारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही मुदत आता दि.२५पर्यंत वाढवण्यात आली आहे,असे सेना भरती कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा