‘जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी’ उपक्रमामुळे नागरिकांचे शंका समाधान

 





छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका)- जिल्हा महसूल प्रशासनाने ग्रामीण भागातील महसूल  विभागाच्या संदर्भात असलेल्या विविध तक्रारीचे निराकरण करण्यासाठी "जिल्हाधिकारी तहसीलचे दारी" हा उपक्रम दूरदृश्य प्रणाली द्वारे राबविण्यात येत असून त्याद्वारे नागरिकांचे शंका समाधान होत असल्याचे परिणाम दिसू लागले आहेत.

            या उपक्रमात नागरिकांच्या निवेदनांवर विचार होऊन तात्काळ निपटारा केला जात असून थेट तक्रारदारांना जिल्हाधिकारी, संबंधित तहसीलदार यांच्या संवाद समन्वयातून विविध तक्रारी प्रत्यक्ष बोलून त्यावर जागीच तोडगा काढला जात आहे. आठवड्यातून दोन वेळेस सोमवार आणि बुधवार असे दुपारी ३ ते ४ या वेळेत कार्यक्रम सुरू आहेत.

            लोकांचा वेळ, पैसा, आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये होणारा त्रास यामधून सुटका झाली असून नागरिकांनी आपली तक्रार वेळेत मांडून ती निकाली निघाल्याचे समाधान त्यांना मिळाले आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या तक्रारदाराचे प्रमाणही यामुळे कमी झाले असून त्यांना योग्य वेळेत न्याय मिळत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अभिनव संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या उपक्रमात विविध समस्याचे  निराकरण करण्यात आले आहे .

            जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर तसेच प्रत्येक तहसील कार्यालयातून तहसीलदार व संबंधित अधिकारी कर्मचारी या  कार्यक्रमास उपस्थित होते.

            यामध्ये फुलंब्री तालुक्यातील नरला गावातील सातबारा विषय तक्रारीचे श्री मारुती यांनी तक्रार दाखल केली होती त्याचेही वेळेवर निराकरण करण्यात आले. पैठण, गंगापूर ,वैजापूर खुलताबाद ,कन्नड ,सोयगाव सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर या सर्व तालुक्यातील तहसीलदार या संवाद उपक्रम उपस्थित होते.

०००००

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा