मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण कालावधीत वाढ
छत्रपती संभाजीनगर,
दि.24(जिमाका)- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व
नाविन्यता विभागामार्फत युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण
देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्याकरीता राज्यशासनाने सुरु केलेली मुख्यमंत्री
युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 6 महिनेवरुन 11 महिने करणेस शासनाने मान्यता
प्रदान केली आहे.
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना
प्रशिक्षण कार्यकाळ 6 महिने ऐवजी 11 महिने करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी
सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रक्षिणार्थींनी पुढील पाच महिण्यासाठी
संबंधित आस्थापनेत रुजू व्हायचे आहे. या वाढीव 5 महिन्यांच्या कालावधीसाटी कार्य प्रशिक्षण
घेण्यास इच्छुक उमेदवारांनी त्यांची आधार, शैक्षणिक पात्रता, वय, अधिवासी प्रमाणपत्र
व जन्म दाखला प्रमाणपत्र इ. पडताळणी https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या पोर्टलवर करावी.
योजनेअंतर्गत ज्या उमेदवाराचा 6 महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी
यापूर्वीच पूर्ण झाला आहे. अशा उमेदवारांना पुढील 5 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित
आस्थापनेत दि.30 एप्रिल 2025 पर्यंत रुजू व्हावे तसेच संबंधित आस्थापनांनी कार्य प्रशिक्षणार्थ्यांना
रुजू करुन घ्यावे, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment