बालहक्क संरक्षणासाठी “पंचसूत्री अभियान” राबविणार - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी




छत्रपती संभाजीनगर, दि.24(जिमाका)- बाल कामगार, बाल भिक्षेकरी, बालकांचे आरोग्य, शाळाबाह्य मुले व बालविवाह यांचा वाढता धोका लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने या समस्यांवर उपाययोजना म्हणून पंचसूत्री - बालहक्क संरक्षण अभियान राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

            अभियान अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीस जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चिमंद्रे,शिक्षणधिकरी अश्विनी लाटकर,महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड,  जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला बालविकास सुवर्णा जाधव तसेच पोलीस विभागाचे अधिकारी बैठकी साठी उपस्थित होते.

पंचसूत्री कार्यक्रम अंमजबजावणी मध्ये बाल कामगार निर्मुलन, बाल भिक्षेकरी निर्मूलन, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण व त्यांना शाळेत दाखल करणे, बाल आरोग्य, बाल हक्का बाबज जनजागृती करण्यात येणार आहे. अभियानाची अंमलबजावणी विविध शासकीय विभागांच्या संयुक्त समन्वयातून करण्याम येणार आहे. यामध्ये कामगार, महिला व बाल विकास, शिक्षण, आरोग्य आणि पोलीस विभाग प्रमुख भूमिका बजावणार आहेत. या विभागांनी नोडल अधिकारी नियुक्त करून, ठराविक कालावधीत कार्यवाहीसाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

ग्रामपंचायत, नगरपालिका, सेवाभावी संस्था व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा सक्रीय सहभाग घेतला जाणार असून, ग्राम व शहरी पातळीवर जनजागृती मोहीम, सर्वेक्षण, चर्चासत्र, मेळावे आणि तपासण्या आयोजित केल्या जाणार आहेत. तालुका स्तरावर अंमलबजावणी व सनियंत्रणासाठी विशेष समिती गठीत करण्यात आली असून, या समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी असतील, तर बाल विकास प्रकल्प अधिकारी सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी दिलीप स्वामी  यांनी या अभियानाचे अंमलबजावणीसाठी सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा