राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान: जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय कार्यालय कन्नड यांना विभागस्तरीय पारितोषिक जाहीर

 



छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व उपविभागीय अधिकारी  कार्यालय, कन्नड यांना सन २०२४-२५ साठी पारितोषिके जाहीर केली आहेत. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज हे जाहीर केले. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयास आधुनिक संकल्पना या श्रेणीत, जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयास कर्मचारी बदल्या ऑनलाईन पोर्टल मार्फत तर कन्नड उपविभागीय अधिकारी  कार्यालयास आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन या श्रेणीत पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारासाठी विभागात एकूण २३ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यातुन ही निवड करण्यात आली असे विभागीय आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे.
'राजीव गांधी प्रशासकीय गतिमान (प्रगती)अभियान व स्पर्धा 2023-24' अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
     जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कामकाजातील आधुनिक संकल्पना व प्रशासनातील आधुनिक संकल्पनेसाठी हा पुरस्कार त्यांना विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत दिनांक 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून  देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अभिलेख कक्षाचे आधुनिकीकरण व डिजिटललायझेशन,सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा आणि सुयोग्य प्रमाणात आधुनिक उपकरणे, 
तसेच कार्यालय नसत्यांचे वर्गीकरण अ ब क ड नुसार करून त्यांचे निंदनीकरण करण्यात आले.
कार्यालयात कर्मचारी पूरक असे कार्यालयीन वातावरण असून आधुनिक बैठक व्यवस्था कार्यालयीन प्राथमिक सुविधा जसे सुयोग्य फर्निचर पंखे, पिण्याचे पाणी,महिलांसाठी विशेष सुविधा, लिफ्ट ची सोय, दिव्यांगांना आवश्यक सुविधा इत्यादी विशेष सुविधा कार्यालयामध्ये करण्यात आल्या आहेत. 
मानव संसाधन व्यवस्थापन आणि कर्मचारी कल्याण अंतर्गत सर्व अधिकारी यांचे सेवा पुस्तके व गोपनीय अहवाल डिजिटलायझेशन करण्यात आलेले असून कर्मचाऱ्यांसाठी तणाव मुक्ती साठी व प्रेरणा देणाऱ्या विविध उपक्रमाचे आयोजन कार्यालयामार्फत करण्यात आले होते. 
अभियानांतर्गत कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे आरोग्य याविषयी विशेष मोहीम राबवण्यात आली.आरोग्य शिबिर, गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढवणाऱ्या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. 
फेरफार आदालत,
सैनिक कल्याण दिवस, 
रस्ता अदालत, 
जलद निपटारा,
जनतेच्या तक्रारीचे निवारण,
भेटीचे फलक,
सोयीसुविधा सुसज्ज प्रतीक्षालय सौंदर्यीकरण,
मदत कक्ष, 
संवाद समुपदेशन कार्यक्रम,
क्षेत्रीय कार्यालयांना भेटी,
चर्चा उद्योगांची,
गाव तिथे सहकारी संस्था,
महिला सक्षमीकरण,
गर्भलिंग तपासणी विरोधी भेट (धाड)
जल समृध्‍द गांव अभियान 
गाव तिथे वड 
युवा संवाद – व्‍यक्‍तीमत्‍व विकास कार्यशाळा
दशसुत्री – सर्वांगीण शैक्षणिक विकासाचा कार्यक्रम
नवीन फौजदारी कायद्या संदर्भात प्रशिक्षण
शून्‍य प्रलंबीतता मोहिम 
रोहयो अंतर्गत जिल्‍हा परिषद शाळा व अंगणवाडी दुरुस्‍ती 
या नवनवीन संकल्पना कार्यालयामार्फत राबविण्यात आल्या.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा