प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारसाठी अर्ज मागविले
छत्रपती संभाजीनगर,
दि.23(जिमाका)- प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार
2025 साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. शौर्य, क्रिडा, समाजसेवा, विज्ञान आणि
तंत्रज्ञान पर्यावरण, कला – संस्कृती आणि नवोन्मेष या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर
नावलौकिक मिळवणाऱ्या मुलांना हा पुरस्कार दिला जातो.
अर्ज नामांकन https://awards.gov.in या संकेतस्थळा मार्फत ऑनलाइन
पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय 5 वर्षापेक्षा अधिक व 31 जुलै
2025 रोजी 18 वर्षापेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ
नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरी
केलेली आहे त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांचे वतीने राज्य
सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी, पंचायत राज संस्था, नागरी स्वराज्य संस्था,
शैक्षणिक संस्था इ.अर्ज करु शकतात. जिल्ह्यातील अशा बालकांचे प्रस्ताव सादर करण्याचे
आवाहन जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चिमंद्रे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment