मयताची ओळख पटविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका)- शहरातील गुलमंडी भागात दि.२२ रोजी बेशुद्ध अवस्थेत मिळून आलेल्या व नंतर मयत घोषीत केलेल्या इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन सिटी चौक पोलिसांनी केले आहे. मयताचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असून गुलमंडी भागात स्वागत मराठा हॉटेल रोडच्या बाजूला हा इसम बेशुद्धावस्थेत मिळून आला. त्यात घाटी दवाखाना येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषीत केले. याबाबत सिटी चौक पोलिसांत अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आला आहे. मयताच्या अंगात राखाडी रंगाचे टी शर्त, फिक्कट निळी जीन्स, दाडी वाढलेली. उंची पाच फुट तीन इंच असे वर्णन असून या इसमाबाबत अधिक माहिती असल्यास वा ओळख पटविण्यासाठी पोलीस हवलदार यु.डी. भाळे यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क क्रमांक ९९२३१७४४३१.
Comments
Post a Comment