विशेष लेख अति उष्णतेच्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सल्ला
काय करावे?
जेव्हा शक्य असेल तेव्हा
पुरेसे पाणी प्या (तहान लागली नसली तरीही), प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत
ठेवावे, ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ORS) वापरा, लिंबू, पाणी, ताक / लस्सी आणि
फळांचे रस यांसारखे घरगुती पेये घ्यावे. टरबुज, खरबुज, संत्री, द्राक्षे, अननस,
काकडी, कोशिंबीर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी असलेली
हंगामी फळे आणि भाज्या खाव्या, पातळ, सैल, सुती आणि शक्य तो हलक्या रंगाचे कपडे
घालावे, तुमचे डोके झाकून ठेवा, थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना
छत्री,टोपी,टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करावा, उन्हात बाहेर जाताना शूज
किंवा चप्पल घालाव्यात, रेडिओ, टीव्ही वर प्रसारीत होणाऱ्या उष्णतेच्या लाटेबाबत
बचाव उपायावर लक्ष द्या आणि स्थानिक हवामान बातम्यांसाठी वर्तमानपत्र वाचावीत, भारतीय
हवामान विभागाच्या (IMD) website https://mausam.imd.gov.in यावर
हवामान विषयी अद्ययावत माहिती घेत राहावे, हवेशीर आणि थंउ ठिकाणी जास्त वेळ
घालावा, थंड हवा येण्यासाठी रात्री खिडक्या उघड्या कराव्यात, जर तुम्ही घराबाहेर
जात असाल, तर तुमची घराबाहेरील कामे दिवसाच्या सकाळ आणि संध्याकाळ वेळेपर्यंत
मर्यादित करावी, दिवसाच्या थंड वेळांमध्ये बाहेरील कामांचे नियोजन करावे.
संवदेनशील
किंवा जास्त जोखीम असलेल्या लोकांसाठी
जरी
कोणालाही उष्णतेचा ताण आणि उष्णतेशी संबंधित आजाराचा त्रास होऊ शकतो, तरी काही
लोकांना इतरांतपेक्षा जास्त धोका असतो आणि त्यांच्याकडे अतिरिक्त लक्ष द्यावे.
समाविष्ट
घटक
लहान अर्भक आणि लहान मुले, घराबाहेर काम करणारे
लोक, गर्भवती महिला, मानसिक आजारपण असलेले व्यक्ती, शारीरिकदृष्ट्या आजारी,
विशेषत: हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब, थंड हवामानापासून ते उष्ण हवामानापर्यंतच्या
प्रवाशांनी त्यांच्या शरीराला उष्णतेला अनुकूल होण्यासाठी एक आठवडा वेळ द्यावा,
जास्त श्रम टाळावेत आणि भरपूर पाणी प्यावे.
इतर
खबरदारी
एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी व्यक्तीवर
देखरेख ठेवली पाहिजे आणि त्यांच्या आरोग्याचे दररोज निरीक्षण केले पाहिजे, तुमचे
घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा, दिवसा खालच्या
मजल्यावर राहण्याचा प्रयत्न करावा, शरीर थंड करण्यासाठी पंखा, स्प्रे बाटल्या,
ओलसर कापड आणि बर्फाचे टॉवेल वापरावा, पाण्यात पाय बुडवल्याने निर्जलीकरण आणि
शरीराची उष्णतेमुळे होणारी अस्वस्थता कमी होऊन जलद थंडावा मिळतो.
काय
करु नये?
उन्हात बाहेर पडणे टाळा, विशेषत: दुपारी १२ ते ३
दुपारच्या वेळी बाहेर असताना कठोर परिश्रम टाळा, अनवाणी बाहेर जाऊ नका, अति
उष्णवेळेत स्वयंपाक करणे टाळा, स्वयंपाक क्षेत्र पुरेशा प्रमाणात हवा येण्यासाठी
दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात, अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट
ड्रिंक्स किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेले पेय टाळा, यामुळे शरीरातील पाणी कमी
होते किंवा पोटात पेटके येऊ शकतात. उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ
नका, उभ्या केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका.
-माहितीस्रोत- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर.
-माहिती संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती
संभाजीनगर.
०००००
Comments
Post a Comment