सांख्यिकी विभागाच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त मोटारसायकल रॅली
छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)- भारत सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयास ७५ वर्षे पूर्ण झाल्या बद्दल आज मोटार सायकल रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीस रवाना केले. संचालक जयप्रकाश होनराव वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी विपीन प्रकाश, अजयकुमार यादव, ज्ञान बहादूर पटेल, मनिष कुमार, आदित्य रंजन, नकुल कुमाल तसेच विभागातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या रॅलीद्वारे राष्ट्रीय सांख्यिकी विभागाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध सर्व्हेक्षण , विविध नमुने सर्व्हेक्षण याबाबत जनजागृती करण्यात आली.
०००००
Comments
Post a Comment