महाराष्ट्र राज्य स्थापना दिन; मुख्य शासकीय समारंभ देवगिरी मैदानावर
छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा ६६ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ देवगिरी मैदान, पोलीस आयुक्तालय येथे गुरुवार दि.१ मे रोजी सकाळि ८ वा होणार आहे. या सोहळ्यात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. या सोहळ्यात स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी- कर्मचारी व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment