जिल्हाधिकारी तहसिलच्या दारी; चार तक्रारींचा तात्काळ निपटारा
छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)- जिल्हाधिकारी तहसिलच्या दारी या उपक्रमाअंतर्गत आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी चार तक्रारींचा तात्काळ निपटारा केला. जिल्हाधिकारी स्वामी हे जिल्हा मुख्यालयातून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांशी दुरदृष्य प्रणालीद्वारे संपर्कत होते. सिल्लोड येथे सोपन सुरमासे यांची जात प्रमाणपत्रा संदर्भात तसेच अमोल नगरे यांची जमीन नोंदणी संदर्भातील तक्रार होती. तसेच फुलंब्री तालुक्यातील मयुर जाधव यांची शिधापत्रिके संदर्भातील तक्रार व बाळू तावडे यांची ७-१२ वरील दुरुस्ती संदर्भात तक्रार होती. या तक्रारी ऐकून तात्काळ निपटारा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी संबंधित तहसिलदारांना दिले. मुख्यालयातून जिल्हाधिकाऱ्यांसमवेत निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड या उपस्थित होत्या तर सर्व तहसिलदार हे दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
००००
Comments
Post a Comment