उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 





छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका)- चिकलठाणा, वाळुज व शेंद्रा येथील औद्योगिक वसाहतीत उद्योगांना पाणी व वीजपुरवठा संदर्भात समस्यांचे सर्व संबंधित विभागांनी संयुक्तपणे कार्यवाही करुन समस्यांचे निराकरण करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात मसिआ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी स्वामी यांची भेट घेऊन आपल्याअडीअडचणी मांडल्या. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अधीक्षक अभियंता (कडा) सब्बनवार, महावितरणचे अधीक्षक अभियंता संदीप दरवडे, उपकार्यकारी अभियंता सचिन बनसोडे, एमआयडीसीचे उप अभियंता गणेश मुळीक, सहा. अभियंता अजय चन्ने, उद्योग निरीक्षक पी.पी. वटाणे, मसिआचे अध्यक्ष  अर्जुन गायकवाड व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना पाणीपुरवठा संदर्भातील अडचणी भेडसावत हेत. ह्या अडचणींवर जीवन प्राधिकरण,महावितरण व एमआयडीसी अशा सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून उपाययोजना काढावी व समस्येचे निराकरण करावे. उद्योजकांनी यावेळी मांडलेल्या इतर समस्यांचेही निराकरण करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांना निर्देश दिले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा