राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव बुधवारी (दि.३०) आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर
छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)- राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. किरण जाधव हे छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्र येथे बुधवारी (३० एप्रिल) आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरील एका कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करणार आहे. आयुक्त डॉ. किरण जाधव यांची सेवा हक्क आयोगाच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त प्रासंगिक या सदराखाली घेतलेली मुलाखत बुधवार दि.३० एप्रिलला सकाळी १० वा. ४५ मि. नी. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर येथून प्रसारित होणार आहे. जाधव हे महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम २०१५ च्या अनुषंगाने नागरिकांना जागृतीपर मार्गदर्शन करणार आहेत.
०००००

Comments
Post a Comment