जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

 









छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका)- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलामार्फत आज आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात हा कार्यक्रम आज पार पडला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के व राष्ट्रीय आपदा मोचन दलाचे आर. जे. यादव हे यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवून प्रशिक्षीत करण्यात आले. नैसर्गिक आपत्ती प्रसंगातील आपली जबाबदारी, सामुहिक जबाबदारी, आपत्ती प्रसंगातील संवाद माध्यमांचा वापर, माहितीचे आदानप्रदान इ. विषयी माहिती देण्यात आली. तसेच तातडीचे वैद्यकीय उपचार, मदत व बचाव कार्य, अडकलेल्या व्यक्तिंच्या सुटका इ. विषयी माहिती देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा