समता पंधरवाडाःजात पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर,दि.२ (जिमाका)- सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दि.१ ते १४ एप्रिल या कालावधीत समता पंधरवाडा राबविण्यात येत आहे. या कालावधीत जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ११ वी , १२ वि विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे,असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती किशोर कुलकर्णी यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता ११
वी व १२ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या व इयत्ता १२ वी नंतर अभियांत्रिकी,
वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, विधी इ. व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश व इतर लाभ घेऊ
इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग
व सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या
मागास प्रवर्ग या विविध प्रवर्गाच्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत जात
प्रमाणपत्र पडताळणीसाठीचे अर्ज समिती कार्यालयात सादर केले नाहीत, अशा
विद्यार्थ्यांसाठी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य
साधून, दि.१ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत ‘समता पंधरवाडा’ निमित्ताने जिल्हा
जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे विशेष मोहिम
राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज https://bartievalidity.
०००००
Comments
Post a Comment