अनधिकृत बालगृहे, अनाथाश्रम, वसतिगृहाची माहिती कळविण्याचे आवाहन


 छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका)-नागरिकांनी आपापल्या परिसरात अनधिकृत संस्थाद्वारे चालविल्या जाणाऱ्या बालगृह, अनाथाश्रम, वसतिगृहे आदींची माहिती चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या क्रमांकावर द्यावी,असे आवाहन महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे. अशा संस्थांमध्ये बालकांना डांबून ठेवून त्यांच्या शारिरीक मानसिक शोषणाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या व अशा घटना बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ आणि सुधारित अधिनियम २०२१ तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण नियम २०१८ मधील तरतूदींचे उल्लंघन करणाऱ्या आहेत. बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ आणि सुधारित अधिनियम २०२१ मधील कलम ४२ नुसार नोंदणी नसलेली संस्था, अथवा अशा संस्था चालविणाऱ्या व्यक्तिला १ लाखांपेक्षा अधिक दंड व १ वर्षे कारावास किंवा अशा  दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. तरी नागरिकांनी आपल्या परिसरातील अशा बेकायदेशीर संस्थांची माहिती कळवावी,असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा