सशस्त्र सेना ध्वज दिन निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका)- आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या व संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या सैनिकांच्या सहाय्य व गौरवासाठी "सशस्त्र सेवा ध्वज निधी संकलन मोहीम २०२४-२५" राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यास १ कोटी ३४ लाख रुपये इतका इष्टांक देण्यात आला आहे. या निधी संकलनात जिल्ह्यातील नागरिकांनी योगदान द्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.आपला निधी नागरिकांनी व सर्व शासकीय विभागांनी धनादेश, धनाकर्ष अथवा रोखीने जिल्हाधिकारी अध्यक्ष जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ४१, सैनिक संकुल, नंदनवन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे जमा करावा. अथवा बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर मधील खाते क्रमांक २०११७३६९१९३ , आयएफसी कोड MAHB0000152 मध्ये ही रक्कम NETF/RTGS द्वारे जमा करता येईल. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर दुरध्वनी ०२४०-२३७०३१३ किंवा भ्रमणध्वनी ९०४५६७७७३० वर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment