मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम २०२४-२५; १०१५ कर्ज प्रस्तावांना मंजूरी देऊन उद्दिष्टपूर्ती

 


छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत जिल्ह्यासाठी ९८६ इतके उद्दिष्ट देण्यात आले होते तथापि विविध बँकेमार्फत जिल्हाभरात एकूण १ हजार १५ कर्ज प्रस्ताव मंजूर झाले आहेत. या आर्थिक वर्षात जिल्ह्याने १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड यांनी दिली आहे.

            यासंदर्भात आज जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने उत्कृष्ट समन्वयासाठी वमुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आभार मानण्यात आले. योजनेचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड, एस.आर.वाघले उपस्थित होते.

            मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेद्वारे उत्पादन क्षेत्रातील उद्योजकाला ५० लाख रुपये, तर सेवा क्षेत्रातील उद्योजकाला २० लाखापर्यंत कर्ज दिले जाते. सर्वसाधारण प्रवर्गातील उद्योजकाला कर्ज रक्कमेच्या १५ ते २५ टक्के, तर विशेष प्रवर्ग, एससी, एसटी, महिला, अपंग, माजी सैनिक, ओबीसी व अल्पसंख्याकांना २५ ते ३५ टक्के अनुदान दिले जाते. जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेतेखाली जिल्हास्तरीय कार्यबल समिती मार्फत कर्ज प्रस्ताव बँकेकडे शिफारस केले जातात. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली. प्रत्येक बॅंकनिहाय प्रलंबित प्रस्तावांचा पाठपुरावा नियमितपणे करण्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांचे निर्देश होते. जिल्ह्यासाठी ९८६ इतके उद्दिष्ट देण्यात आले होते तथापि विविध बँकेमार्फत जिल्हाभरात एकूण १ हजार १५ कर्ज प्रस्ताव मंजूर झाले आहेत. अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा