सुभेदारीच्या व्हीव्हीआयपी सुट चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन









छत्रपती संभाजीनगर
, दि.२३(जिमाका)- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुभेदारी विश्रामगृहाच्या आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या व्हीव्हीआयपी सुट्चे आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

            विधानपरिषद सदस्य आ. संजय केणेकर तसेच अधीक्षक अभियंता सुंदरदास भगत, कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, श्रीमती प्रिया पुजारी, माजी महापौर नंदकुमार घोडेले तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. शिरसाट यांच्या हस्ते फीत कापून व कोनशिला अनावरण करुन या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.             पालकमंत्री श्री. शिरसाट म्हणाले की, सुभेदारी या विश्रामगृहाला ऐतिहासिक वारसा आहे. येथे अनेक मान्यवर वास्तव्यास राहून गेले आहेत. या शहराचाही लौकीक आहे. या लौकीकाला साजेशी ही वास्तू तयार झाली आहे, याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

            प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता श्रीमती पुजारी यांनी माहिती दिली की, या इमारतीत  बेसमेंट मजल्यावर वाहनतळ, वाहनचालकांसाठी कक्ष, इलेक्ट्रीक रुम, तळ मजल्यावर दोन व्हीव्हिआयपी सुट, स्वयंपाक व भोजन कक्ष,  पुरुष महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छता गृहे,  पहिल्या मजल्यावर एक व्हीव्हीआयपी कक्ष, कॉन्फरन्स हॉल, प्री फंक्शन लॉबी, सार्वजनिक स्वच्छता गृहे, दुसरा मजल्यावर एक मुख्यमंत्र्यांचा कक्ष, एक व्हीव्हीआयपी कक्ष, टेरेस रुफ गार्डन,  या शिवाय प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट, इलेक्ट्रिक रुम  आदी सुविधा आहेत. या कामांसाठी एकूण १३ कोटी १८ लक्ष ६३ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता होती.  त्यापैकी स्थापत्य कामावर ८ कोटी ५ लक्ष ४ हजार रुपये, अंतर्गत सजावटीकरणावर १ कोटी ७१ लक्ष १ हजार रुपये तर विद्युत कामांवर ३ कोटी ८३ लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा