पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा

  छत्रपती संभाजीनगर, दि.८(जिमाका)- पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध आहे. एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी पाच वर्षे प्रतिक्षा यादी ठेवण्याची सोय केली आहे. सन २०२५-२६ या वर्षात पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री, शेळीपालक असे पर्याय निवडण्याची सोय देण्यात आली आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी https://ah.mhabms.com वर अर्ज करावा. तसेच AH-MAHABMS या मोबाईल ॲपवर सुद्धा अर्ज करता येणार आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज दि.१ जून २०२५ पर्यंत करता येणार आहेत. अधिक माहिती वा तांत्रिक अडचणींसाठी १९६२ याता टोल फ्री क्रमांकावर सोमवार ते शनिवार सकाळी ७ ते सायं.६ यावेळात संपर्क साधावा अथवा नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे. 

            ऑनलाईन अर्ज मागविणे व लाभार्थी निवड प्रक्रियेचे वेळापत्रकही विभागाने जाहीर केले आहे. दि.२ जून पर्यंत ऑनलाईन अर्ज स्विकारणे, दि.३ ते ७ जून- रॅन्डमायझेशन पद्धतीने लाभार्थ्यांची प्राथमिक निवड, दि.८ ते १५ जून  मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रे अपलोड करणे, दि.१६ ते २४ जून पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत कागदपत्रे पडताळणी करुन निवड पूर्ण करणे, दि.२५ ते २७ जून लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रातील त्रुटी दूर करणे, दि.२८ -३० जून कागदपत्रे अंतिम पडताळणी, दि.१ जुलै राखीव व दि.२ जुलै रोजी अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार करणे असा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला असून लाभार्थ्यांनी अर्ज करावे,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एन.एस. कदम यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा