कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजीत ‘लघु उद्योजक प्रशिक्षण’ कार्यक्रमास उद्योजकांचा प्रतिसाद

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२३(जिमाका)- जिल्ह्यातील लघु उद्योजकांना उद्योग व्यवसायात येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी  कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून  आयोजीत ‘लघु उद्योजक प्रशिक्षण’ कार्यक्रमास उद्योजकांनी उत्तम प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील १३० लघु उद्योजकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला.

            येथील देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थायेथे हे प्रशिक्षण पार पडले. दि. आसरा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील १३० लघु उद्योजकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला.  दि. आसरा फाउंडेशनचे स्नेहा नन्नावरे, प्रकाश आगाशे, उद्योजक शिवप्रसाद जाजू, डॉ. आनंद गोडसे, आशीष गर्दे यांनी मार्गदर्शन केले. विशेष कार्य अधिकारी कृष्णा कांगुले हे यावेळी उपस्थित होते.याठिकाणी अण्णासाहेब पाटील महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, माविम, अपंग व वित्त विकास महामंडळ इ. महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते. प्रास्ताविक उपायुक्त श्रीमती विद्या शितोळे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सहायक आयुक्त. सुरेश वराडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुरेश बहुरे, योगेश उगले, शालिक चौधर, विरेंद्र चव्हाण, गजानन खोकड, रामदास फुले, नागेश मिटकरी, प्रीतम सोनवणे, आदित्य चोपडे आदींनी परिश्रम घेतले.  

०००००

 

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा