ऑरिक हॉल, शेंद्रा मध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना कार्यालयासाठी सवलतीच्या दरात भाड्याने जागा उपलब्धतेचा निर्णय
छत्रपती संभाजीनगर, दि.४(जिमाका)- शेंद्रा औद्योगिक वसाहतीत ऑरिक हॉल मध्ये कार्यालय थाटण्यासाठी सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सवलतीच्या दरात (२५ रुपये प्रति चौरस फुट प्रमाणे) भाड्याने जागा उपलब्ध करुन देण्याबाबतची मागणी मान्य करण्यात आली असून त्यासंदर्भात एमआयटीएल (महाराष्ट्र इंडस्ट्रिय टाऊनशिप लिमिटेड)च्या वतीने परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, केंद्रीय वाणिज्य व उद्योग
मंत्री पियुष गोयल उद्योजकांच्या अडी-अडचणी जाणून
घेण्यासाठी दि. १९ फेब्रुवारी रोजी आले होते. त्यावेळी ऑरिक हॉल, शेंद्रा येथे पार पडलेल्या बैठकीत उपस्थित विविध औद्योगिक
संघटनांनी ऑरिक हॉल मध्ये रु. ५० प्रति चौरस फुट ऐवजी रु. २५ प्रति चौरस फूट दराने कार्यालयासाठी जागा भाड्याने उपलब्ध
करून देण्याची मागणी केली होती. या मुद्द्यावर श्री. गोयल यांनी या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक निर्णय घेणे बाबत सुचना केल्या होत्या. त्यानुसार
महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड (MITL) ने ऑरिक हॉल, शेंद्रा येथील भाडे दर रु. ५० ऐवजी रु. २५ प्रति चौरस फूट
दराने जागा भाड्याने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सूक्ष्म, लघु आणि मध्यम
उद्योग (MSME) उद्योजकांच्या हितासाठी घेण्यात आला आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम
उद्योग (MSME) उद्योजक उद्योग उभारण्यासाठी भूखंड खरेदी करतात व सदर
भूखंडावर उद्योग उभारण्यासाठी काही कालावधी लागतो अशा कालावधीत त्यांना त्यांचे
कार्यालय चालू करण्यासाठी कमी दराने जागा उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत ऑरिक हॉल, शेंद्रा येथे रु. २५ प्रति चौरस फूट या सवलतीच्या दराने सर्व सोईयुक्त जागा भाड्याने सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उद्योजकांस उद्योग उभारणीस मदत होईल.
०००००
Comments
Post a Comment