‘नीट’ परीक्षा सुरळीत

 






छत्रपती संभाजीनगर, दि.४(जिमाका)- नीट २०२५ची परीक्षा   आज शहरातील ४९ केंद्रांवर पार पडली. तब्बल १९ हजार ५०० विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ठ होते. त्यापैकी १९१७९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षेस हजेरी लावली. उपस्थितीची टक्केवारी ९८.३५ टक्के इतकी होती. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सज्जता केली होती. वाढत्या उन्हाची स्थिती पाहता प्रत्येक परीक्षा केंद्रावर पिण्याचे पाणी, सावलीची सोय आदी सुविधा करण्यात आल्या शिवाय प्रत्येक परीक्षा केंद्रावर वैद्यकीय पथक देखील सज्ज ठेवण्यात आले होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतः काही परीक्षा केंद्रांना भेटी देऊन परीक्षा केंद्रावर उपलब्ध सुविधा व सज्जतांची पाहणी केली. कोणताही अनुचित प्रकार न होता परीक्षा सुरळीत पार पडली अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती संगिता राठोड यांनी दिली.

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा