कौशल्य विकास विभागाचा उपक्रम; शुक्रवारी (दि.२३) उद्योजकता प्रशिक्षण

 छत्रपती संभाजीनगर ,दि.२०(जिमाका)- कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि दि आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  शुक्रवार दि.२३ रोजी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत हे प्रशिक्षण होणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विविध क्षेत्रातील लघु व सूक्ष्म उद्योजक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या उद्योजक मेळाव्यामध्ये आसरा फाउंडेशनचे प्रोग्राम मॅनेजर प्रकाश आगाशे, पवन ग्रुपचे सीईओ शिवप्रसाद जाजू  हे व्यवसाय कर्ज, पतपुरवठा, कर्ज प्रकरण, कर्ज प्रक्रिया, व्यवसाय उभारणी इ. बाबत तर डॉ. आनंद गोडसे हे सामुहिक प्रयत्न वाढविणे, सर्जनशिलता, संवाद कौशल्य याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणात सहभागींना डिजिटल प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून, सहभाग नोंदविण्याकरिता खालील लिंक वर जाऊन आपली नोंदणी करावी. प्रवेशासाठीची लिंकः- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScoRxI5RGz2Dniswo8Je42b80Kp0Rf6Izy0Lno_m59FwPncgQ/viewform?usp=header

 अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२४०-२९५४८५९ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा व अधिकाधिक उद्योजकांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सुरेश वराडे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा