५४२ मोटार अपघात दावे प्रकरणात ४ कोटी ३० लाखांची नुकसान भरपाई; पक्षकारांना संपर्क साधण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर, दि.८(जिमाका)- जिल्हा न्यायालयात  जुन्या व निकाली निघालेल्या  ५४२  मोटार वाहन अपघात दावे प्रकरणातील ४ कोटी ३० लाख ६२ हजार ८१५ रुपये नुकसान भरपाईची अवितरीत रक्कम  संबंधित पक्षकारांना देण्यात येणार आहे. या सर्व पक्षकारांची यादी  www.aurangabad.dcourts.gov.in  या संकेतस्थळावर व जिल्हा न्यायालयाच्या सुचना फलकावर आहे. संबंधित पक्षकारांनी जिल्हा न्यायालयात संपर्क साधून आपली रक्कम प्राप्त करुन घ्यावी,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणीस यांनी केले आहे.

            सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली    महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशान्वये जिल्ह्यातील मोटार अपघात दावे प्रक्ररणातील  अवितरीत रक्कम संबंधिताना प्रदान करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण ५४२ प्रकरणात ४ कोटी ३० लाख ६२ हजार ८१५ रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम अवितरीत आहे. अशा ५४२ लोकांची यादी ही www.aurangabad.dcourts.gov.in  या संकेतस्थळावर व जिल्हा न्यायालयाच्या सुचना फलकावर आहे.  लोकांनी ही यादी पहावी. त्यानुसार येत्या आठ दिवसांच्या आत संबंधितांनी आपल्या रकमा सहा. अधीक्षक, वित्त व लेखा विभाग, ३ रा मजला, जिल्हा सत्र न्यायालय, छत्रपती संभाजीनगर येथे समक्ष उपस्थित राहून रक्कम तात्काळ घेऊन जावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सहा. अधीक्षक लेखा विभाग ०२४०-२३५३१५८, प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय ०२४०-२३३४८३९, अधीक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण -८५९१९०३६२० या क्रमांकावर संपर्क साधावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा