राज्यातील पहिलाच उपक्रम; बंदीजनांसाठी कारागृहातच कौशल्य विकास प्रशिक्षणास सुरुवात
छत्रपती संभाजीनगर, दि.८(जिमाका)-आयुष्यात एका बेसावध क्षणी घडलेला गुन्हा. त्याबद्दल न्यायालयाने दिलेली शिक्षा म्हणून कारागृहातील बंदीवास भोगतांना कौशल्य प्रशिक्षण घेता यावे आणि बंदीवास संपल्यानंतर पुन्हा आपले आयुष्य सन्मानाने आणि सन्मार्गाने सुरु करता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाने कारागृहात कौशल्य विकास प्रशिक्षणाचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. आज जिल्हा मध्यवर्ती कारागृहात या उपक्रमाचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. या उपक्रमामुळे कारागृह हे खऱ्याअर्थाने सुधारगृह होणार आहे. विशेष म्हणजे राज्यात प्रथमच असा उपक्रम छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात राबविण्यात येत आहे.
जिल्हा मध्यवर्ती
कारागृहात आज कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी, कौशल्य विकास प्रशिक्षण विभागाचे सह. संचालक पी.टी.देवतळे, देवगिरी
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रदीप दुर्गे, कौशल्य विकास विभागाचे सहा.
संचालक सुरेश वराडे, मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक दत्तात्रय गावडे आदी यावेळी उपस्थित
होते.
बंदीजनांसाठी
कौशल्य विकास प्रशिक्षण राबविणार- जिल्हाधिकारी स्वामी
जिल्हाधिकारी स्वामी
म्हणाले की, आपल्या बंदीवासा दरम्यान बंदीजन बांधव हे अनेक कामे करत असतात.
त्याद्वारे ते प्रशिक्षित होतातही मात त्याचे प्रमाणीकरण होत नाही. त्यामुळे
समाजामध्ये परतल्यावर या कौशल्याचा काहीही उपयोग होत नाही. या प्रशिक्षण
कार्यक्रमाद्वारे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या बंदीजनांना रितसर प्रमाणपत्र दिले
जाईल. त्याआधारे ते नोकरी मिळवू शकतील वा स्वतःचा व्यवसाय सुरु करु शकतील आणि आपले
आयुष्य पुन्हा सन्मानाने सुरु करु शकतील. आपल्या कुटुंबियांचा सांभाळ करु शकतील.
आगामी काळात अन्य व्यवसायांचेही प्रशिक्षण सुरु करण्यात येतील. तसेच महिला
बंद्यांसाठीही त्यांना अनुरुप असे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतील,असे
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
प्रास्ताविक सुरेश वराडे यांनी केले. पी.टी.देवतळे
, प्रदीप[ दुर्गे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दत्तात्रय गावडे यांनी
उपस्थितांचे आभार मानले.
त्यानंतर जिल्हाधिकार
स्वामी यांनी कारागृहातील कार्यशाळांना भेटी देऊन
तेथे बंदीजन करीत असलेल्या कामांची पाहणी केली. त्यांनी बनविलेल्या
उत्पादनांचीही पाहणी केली.
असा आहे
उपक्रम
कारागृहात बंदीजन असतात.
त्यांना त्याठिकाणी अनेक व्यवसाय करावे लागतात. त्यात सुतारकाम, लोहार काम ते
स्वयंपाकी वगैरे अनेक कामे त्यांच्याकडून करवुन घेतली जातात. बंदीवास भोगल्यानंतर
पुढे समाजात आल्यावर हाताशी काहीही नसते. त्याकरीता जिल्हा प्रशासनाने हा
नाविन्यपूर्ण उपक्रम हाताशी घेतला. जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण
योजनेतून ‘कारागृहात कौशल्य प्रशिक्षण
केंद्र’ हा उपक्रम राबविण्यात येत
आहे.
जिल्हा
वार्षिक योजनेतून ११ लक्ष ३० हजार रुपयांचा निधी
जिल्हा वार्षिक योजनेतून या उपक्रमासाठी ११ लक्ष
३० हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संनियंत्रणाखाली देवगिरी शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे आपले प्रशिक्षक पाठवून
बंदीजनांना प्रशिक्षण देईल. त्यासाठी २० बंदीजनांची एक बॅच असे दोन बॅचेस मध्ये हे
प्रशिक्षण दिले जाईल. फिटर फॅब्रिकेशन आणि इलेक्ट्रिशियन फिल्ड टेक्निशियन अदर होम
ॲप्लायन्सेस असे दोन अभ्यासक्रम प्रारंभी सुरु करण्यात आले आहेत. ४०० तास आणि ५४० तास
कालावधीचे हे दोन अभ्यासक्रम आहेत.
प्रशिक्षण
पूर्ण केल्यावर मिळणार प्रमाणपत्र
अभ्यासक्रम पूर्ण
केल्यानंतर प्रशिक्षीत बंद्यांचे गुणांकन करण्यात येणार आहे. त्याआधारे पात्र
बंद्यांना राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC) मार्फत आयटीआय प्रशिक्षण पूर्ण
केल्याचे प्रमाणपत्र अदा करण्यात येईल. त्यामुळे या प्रमाणपत्राच्या आधारे आपला कारावास संपून बाहेर आल्यावर बंदीजनांना
आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करणे अथवा नोकरी करणे इ. संधी उपलब्ध होतील.
व्यवसायासाठी त्यांना बॅंकांकडून कर्ज पुरवठाही
उपलब्ध होऊ शकेल व त्यांना मुख्य प्रवाहात सहभागी होऊन आपले जीवनमान सुकर
करण्यास मदत होईल.
०००००



.jpeg)


Comments
Post a Comment