हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज मागविले
छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)-हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रम हा आयआयएचटी बरगढ व वेंकटगिरी ओडीशा येथे राबविला जातो. या पदविका अभ्यासक्रमासाठी सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्राकरीता प्रवेश देण्यासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, बाळासाहेब पवार सहकार भवन, तिसरा मजला, जाफर गेट, छत्रपती संभाजीनगर येथे अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रवेश अर्जाचा नमूना व अन्य अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या www.dirtexmah.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्जाचा नमूना प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयातही उपलब्ध आहे. इच्छुकांनी आपले अर्ज दि.१० जून पर्यंत प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात जमा करावे,असे आवाहन आयुक्त वस्त्रोद्योग संजय दैने यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment