जिल्हा व्यापारी महासंघातर्फे रक्तदान शिबीर

 


छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका)- जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा व्यापारी महासंघ तसेच गजानन महाराज व्यापारी महासंघ यांच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खीरोळकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  मारोती मस्के, डॉ.महेश लड्डा तसेच व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी स्वामी यांनी रक्तदान, जलपुनर्भरण व वृक्षरोपण करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी, जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष संजय कांकरिया, महाराष्ट्र चेंबर उपाध्यक्ष प्रफुल मालानी, कॅट वरिष्ठ उपाध्यक्ष अजय भाई शहा, मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष आदेशपाल सिंग छाबडा, उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण राठी, वरिष्ठ मार्गदर्शक जिल्हा व्यापारी महासंघ सरदार हरी सिंग, पंकज लोया, संतोष कावळे, विकास सावजी, शिवशंकर स्वामी, जयंत देवळानकर, अनंत जयस्वाल, नितीन बारपांडे, अनंत फुलवाडकर, चंदनभाऊ काहीटे, पुनिया, सोनवणे, नामदेव वेताळ, नरेंद्र खोमणे, गंगाधर कोठारी, व अन्य व्यापारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशंकर स्वामी व जयंत देवळाणकर यांनी केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा