प्रलंबित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विशेष उपक्रम; दर महिन्याच्या २ तारखेला तक्रार निवारण दिवस
छत्रपती संभाजीनगर, दि.१०(जिमाका)- प्रलंबित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन तक्रार/ प्रलंबितता निवारण दिवस राबविणार आहे. त्याची सुरुवात याच महिन्यात दि.१८ पासून उपविभागीय स्तरावर तर जिल्हास्तरावर दि.२० रोजी होणार आहे. तर जुलै महिन्यापासून दर महिन्याच्या १ तारखेला उपविभागीयस्तरावर तर २ तारखेला जिल्हास्तरावर तक्रार निवारण दिवस आयोजीत करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यासंदर्भात आज
निर्देश दिले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात नागरिकांना त्यांच्या तक्रारी व
गाऱ्हाण्यांचे निवारण करता यावे यासाठी प्रत्येक महसूल कार्यालयात तक्रार पेटी व
QR कोड द्वारे ऑनलाईन तक्रार प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, कोणतेही
प्रकरण १० जून २०२५ पर्यंत प्रलंबित राहू नये, यासाठी ‘झिरो पेंन्डंसी’चे स्पष्ट
निर्देश दिलेले आहेत.तरीही ज्या नागरिकांच्या तक्रारी/ प्रलंबित प्रकरणे असतील अशा
नागरिकांनी थेट संपर्क साधावा, त्यांच्या समस्या ऐकून घेता याव्यात, यासाठी महसूल
विभागाने ‘तक्रार / प्रलंबितता
निवारण दिवस’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
या
उपक्रमाअंतर्गतः-
बुधवार
दि.१८ रोजी उपविभागीय
अधिकारी व तहसील कार्यालयात 'तक्रार निवारण होईल. त्यानंतर शुक्रवार दि.२० रोजी जिल्हाधिकारी
कार्यालयात ‘तक्रार निवारण’ होईल. तसेच जुलै
महिन्यापासून दर महिन्याच्या १ तारखेला (सुट्टी असल्यास दुसऱ्या
दिवशी) उपविभागीय व तहसील कार्यालयात आणि २ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात हा
दिवस राबविण्यात येईल.
यासंदर्भातील
माहिती ग्रामपंचायतीत प्रसिद्ध करण्यात
येईल. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत प्रमुख अधिकारी व संबंधित शाखांचे कर्मचारी
उपस्थित राहतील. आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या नाव, पत्ता व तक्रारीची नोंद घेऊन
त्वरित उपाययोजना केली जाणार आहे. तक्रार पेटीतील अर्जही याच दिवशी उघडून
कार्यवाही केली जाईल,असे स्पष्ट करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment