पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा: कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२७) उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर, दि.२३ (जिमाका)- जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.२७ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय कांचनवाडी येथे करण्यात आले असून कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.
छत्रपती
शाहु महाराज शिक्षण संस्थेचे,छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय,कांचनवाडी,छत्रपती
संभाजीनगर येथे शुक्रवार दि.२७ रोजी सकाळी
साडनऊ वा. रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.
नामांकीत कंपन्यांचा
सहभाग
या मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर येथील हर्मन फिनोकेम लि, धुत ट्रांन्समिशन प्रा.लि., ऑस्बॉर्न
लिप्पर्ट (ई) प्रा.लि, अलंकार इंजिनीअरींग इक्विपमेंट प्रा.लि., टॉवर मेकॅनिक प्रा.लि.,
बी.जी. लिन इलेक्ट्रॉनिक्स , वरुण बेवरेजेस
लि.पैठण,औरंगाबाद ऑटो अॅन्सीनरी प्रा.लि,अजंठा फार्मा ली. चितेगांव /पैठण ,.किंग फूडटेक
प्रा.लि. पैठण ,एक्सेल प्लेसमेंट, व्हीजुअल इन्फोसिस्टम प्रा. लि. , मिनाक्षी अॅग्रो
इंडस्ट्री एल एल पी,हिंदूस्तान कंपोजीट लि. ,उमासन्स ऑटो कॉम्प प्रा.लि. ओ एम आर बागला
आटोमोटीव्ह .लि., फोरेस इंजिनियरींग (ई) प्रा.लि, टिम प्लस एच आर सर्व्हिसेस प्रा.लि.,
टि. के. प्रेसिजन प्रा.लि. ,फ्लिपकार्ड होलसेल बेस्टप्राइस वालमार्ट,मेधावी एस्पायर
प्रा.लि.,साई सुप्रीम प्रा.लि., अर्पिता इंजिनिअरिंग
प्रा.लि.,व्हेरोक इंजिनिअरिंग प्रा.लि.,एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी प्रा.लि.,बी जी इलेक्ट्रिकल्स
अँड इलेक्ट्रॉनिक प्रा.लि.,अजित सीड्स प्रा.लि.एन्कोर हेल्थकेअर पा.लि. इ. नामांकीत
कंपन्या सहभागी होत आहेत.
विविध शैक्षणिक अर्हतेची
१२८३ पदे
या नियोक्त्यांकडे १२८३ पदे उपलब्ध
असून पदांना आवश्यक शैक्षणिक पात्रता (कोणत्याही
शाखेची पदवी, इंजिनीअरींग,डिप्लोमा, आय टी आय,एच एस सी, एस एस सी उतीर्ण इ.) असलेल्या
उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाईन नोंदणी सुविधा
या मेळाव्यात
सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी
व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे आणि मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
संकेतस्थळावर
नोंदणी करताना अथवा रिक्तपदासाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी
क्रमांक ०२४०- २९५४८५९ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच मेळाव्याच्या दिवशी
उपस्थित राहून पात्रतेप्रमाणे देवून रोजगार संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य
विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त एस.आर.वराडे यांनी केले
आहे.
०००००


Comments
Post a Comment