वसंतराव नाईक वि.जा.-भ.ज. विकास महामंडळाच्या कर्ज योजना

 छत्रपती संभाजीनगर, दि.17 (जिमाका)-वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत तसेच या महामंडळाच्या दोन उपकंपन्यांमार्फत विविध कर्ज योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन  अतिरिक्त जिल्हा व्यवस्थापक पी.एम.झोंबाडे यांनी केले आहे.

या महामंडळ अंतर्गत दोन उप कंपन्या पैलवान कै.मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ(मर्या.) व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (मर्या.) यांच्या अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लोकाकरीता खालील प्रमाणे योजना राबविल्या जात आहेत. त्यांची माहिती याप्रमाणे-

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनाः- या योजनेमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा 15 लक्ष पर्यंत आहे. अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रर्वगातील असावा. वय 18 ते 50 वर्ष दरम्यान, अर्जदाराचे बँक खाते आधारकार्ड संलग्न असणे आवश्यक. योजना ऑनलाईन असून याकरीता आधारकार्ड, राहिवाशी दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला शाळेचा दाखला संबधित व्यवसायाचे कोटेशन आणि वाहनासंबधी असल्यास लायसन्स परवाना इ. मुळ कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.

सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता 250 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट

गट कर्ज व्याज परतावा योजनाः- करीता कर्जाची मर्यादा 10 ते 50 लक्ष  रुपयांपर्यंत असून या योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरीता, नोंदणीकृत गट असावा व गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्‌या जमाती व विशेष मागस प्रवर्गातील असावे, गटातील सदस्याचे वय 18 ते 45 वर्षे पर्यंत, गटातील लाभार्थीचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. गटातील सर्व सदस्याचे सिबिल क्रेडीट स्कोअर किमान 500 इतका असावा. उत्पन्नाची मर्यादा नॉन क्रिमीनल करीता 8 लाखाच्या मर्यादेत. या ऑनलाईन योजना असून या करीता सदस्याचे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी, आधारकार्ड, शाळेचा दाखला, संबधित व्यवसायाचे कोटेशन, सोबत मूळ कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.

सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता 3 गटांचे उद्दिष्ट.

एक लक्ष रुपये थेट कर्ज योजनाः- या योजनेमध्ये महामंडळाकडून एक लक्ष रुपये थेट कर्ज दिले जाते. योजनेसाठी दोन जामिनदार व बोझा नोंद करुन देणे महत्वाचे असून या करीता जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (1 लाख पर्यंत मर्यादा) रेशन कार्ड आधार कार्ड, रहिवाशी इ.कागदपत्रासह  व्यवसायानूसार कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. या योजनेचे फॉर्म महामंडळातून जातीचा मूळ दाखला व आधार कार्ड दाखवून रितसर नोंद करुन अर्जदारास मिळेल.

सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता 400 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट

25% बीज भांडवल कर्ज योजनाः- बीजभांडवल योजना ही बँकेमार्फत राबविली जात असून अर्जदाराचे महामंडळाकडे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, रहिवाशी, पॅनकार्ड, व्यवसायानूसार आवश्यक कागदपत्र जोडून कार्यालयास दाखल करणे महत्वाचे आहे. यापूर्वी लाभार्थीने कर्जाचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत कर्ज प्रस्ताव दाखल करता येणार नाही.

जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्याकरीता महामंडळाच्या या www.vjnt.in संकेतस्थळाला भेट द्यावी व आपले अर्ज सादर करावे,असे आवाहन अतिरिक्त जिल्हा व्यवस्थापक पी.एम.झोंबाडे यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा