साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ : अनुदान बीजभांडवल व थेट कर्ज योजना; उद्यापासून (दि.२५) अर्ज स्वीकरण्यास सुरुवात
छत्रपती संभाजीनगर, दि.२३(जिमाका)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत अनुदान, बीजभांडवल व थेट कर्ज योजना राबविण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी सन २०२५-२६ करीता पात्र लाभार्थ्यांकडून जिल्ह्यातील मातंग समाजातील इच्छूकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यासाठी दि.२५ पासून अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.
पात्रतेचे
निकषः-
अर्जदार हा मांग, मातंग समाजातील असावा. इच्छूक अर्जदाराचे वय १८ वर्षे पूर्ण व ५०
वर्षापेक्षा जास्त नसावे. शहरी व ग्रामीण भाागातील अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक
उत्पन्न मर्यादा तील लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. अर्जदाराने या पूर्वी महामंडळाच्या
व शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन
योजनेत साधारणपणे समाविष्ट लघु व्यवसाय उदा. शेळी पालन, फळ भाजी विक्री, हॉटेल
व्यवसाय, फिरते साडी सेंटर, झाडू टोपले, शिलाई मशीन, ब्युटी पार्लर, मसाला उद्योग,
पापड उद्योग, फिरते कापड व्यवसाय, बेकरी, द्रोण पत्रवाळी तसेच अर्जदाराच्या
मागणीनूसार व्यवसायासाठी कर्ज मागणी प्रस्ताव अर्ज हस्तलिखित, टंकलिखित दोन प्रतीत
स्वत : अर्जदाराने मूळ कागदपत्रासह उपस्थित राहून दाखल करावेत. त्रयस्थ, मध्यस्थामार्फत
कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत.
सोबत जोडावयाची कागदपत्रे
जातीचा दाखला, उत्पन्न दाखला,
रेशनकार्डची झेरॉक्स प्रत, आधार कार्डची झेरॉक्स प्रत, पॅन कार्डची झेरॉक्स प्रत,
दोन पासपोर्ट साईज फोटो, व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन), व्यवसाय ज्या ठिकाणी
करावयाचा आहे त्या ठिकाणीची भाडेपावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा
(नमुना नं.८, लाईट बिल व टॅक्स पावती) व्यवसाय संबंधित तांत्रिक प्रमाणपत्र तसेच
अनुभवाचा दाखला, शैक्षणिक दाखला यापूर्वी शासकीय योजनेअंतर्गत किंवा महामंडळाकडून
अनुदान, कर्जाचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र.
प्रकरणासोबतची
सर्व कागदपत्रे स्वत:च्या स्वाक्षरीने साक्षांकित करावीत.योजनेचे कर्ज मागणी अर्जापैकी
अर्जदारांनी जातीचा दाखला दाखविल्यानंतर अनुदान, बीजभांडवल व थेट कर्ज योजनेपैकी
एकच अर्ज कार्यालयात विनामुल्य मिळेल यांची नोंद घ्यावी.
कर्ज मागणी अर्ज वाटप व
स्विकारण्यासाठी दि.२५ जून ते ७ जुलै पर्यंत कालावधीत सकाळी १० ते सायं.५
वाजेपर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या, जिल्हा
कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपूरा, शिवाजी हायस्कूलच्या
बाजूला या ठिकाणी स्विकारले जातील. त्यानंतर कर्ज मागणी अर्ज, प्रस्ताव स्विकारले
जाणारी नाही यांची नोंद घेण्यात यावी.
अनुदान, बीजभांडवल व थेट कर्ज
योजनेअंतर्गत कार्यालयाकडे यापूर्वी दाखल केलेले सर्व जुने कर्ज प्रस्ताव रद्द
समजण्यात यावे. उद्दिष्टापेक्षा जास्त प्रकरणे प्राप्त झाल्यास शासन निर्णयानूसार
लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल. अनुदान, बीजभांडवल व थेट कर्ज
योजनेअंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थीचे कर्ज प्रकरण जिल्हा लाभार्थी निवड
समितीच्या मान्यतेने कार्यालयास मंजुरीसाठी शिफारस करण्यात येईल, असे साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या.चे सदस्य सचिव तथा जिल्हा व्यवस्थापक
यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment