कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा जिल्हा दौरा
छत्रपती संभाजीनगर, दि.२५ (जिमाका)- राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे शुक्रवार दि.२७ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे-
शुक्रवार
दि.२७ रोजी सकाळी पावणे नऊ वा. हॉटेल रामा
येथून घृष्णेश्वर मंदिराकडे प्रयाण व दर्शनासाठी राखीव, सव्वा १० वा. उद्योजकांशी
चर्चा, स्थळ- ऑटो क्लस्टर सभागृह, वाळूंज औद्योगिक क्षेत्र. सकाळी सव्वा ११ वा.
पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यास उपस्थिती, स्थळ- राजर्षी शाहू महाराज सभागृह,
छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय कांचनवाडी, दुपारी सव्वा १२ वा. भाजपा कार्यकर्ता
मेळावा, स्थळ- आयएमए हॉल, अदालत रोड, समर्थ नगर, दुपरी सव्वा वा. भाजपा कोअर कमिटी
बैठक, स्थळ- आयएमए सभागृह, अदालत रोड, समर्थ नगर,
दुपारी १ वा. ३५ मि. दैनिक महाराष्ट्र टाईम्स यांच्याकडील पुस्तक प्रकाशन
सोहळ्यास उपस्थिती,साई स्क्वेअर, दुसरा मजला, उस्मानपुरा सर्कल, क्रांती चौका जवळ,
दुपारी २ वा. जनसंवाद कार्यक्रम- स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह,
जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर, दुपारी पावणे तीन वा. पंडीत दीनदयाळ उपाध्याय
एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सव जिल्हास्तरीय समिती बैठक, स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय,
दुपारी सव्वा तीन वा. कौशल्य विकास विभागाची आढावा बैठक, स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय,
दुपारी ४ वा. संस्था व्यवस्थापन समिती बैठक, स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, दुपारी
साडेचार वा. पत्रकार परिषद, स्थळ- जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी
कार्यालय, सायं.५ वा. रखीव, सायं. साडेसहा वा. सदिच्छा भेट, स्थळ-दैनिक दिव्य
मराठी कार्यालय. रात्री ८ वा. ५५ मि. नी. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथून
विमानाने मुंबईकडे रवाना.
०००००
Comments
Post a Comment