वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर, दि.6 (जिमाका) –जिल्ह्यातील सर्व अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इमाव, आर्थिक मागास वर्ग प्रवर्गातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी Revert Black केलेले अर्ज फेरसादर केले नाहीत त्यांनी दि.10 जून 2025 पर्यंत त्रुटीची पूर्तता करुन अर्ज फेरसादर करावेत अन्यथा त्यांचे अर्ज बाद होतील.

विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2025- 26 करीता शासकीय वसतीगृह प्रवेश दि.11 जून 2025 पासून सुरु असून इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता पोर्टल सुरु करण्यात येणार आहे.

अर्जाची प्रिंट प्रत 1000 मुलांचे शासयकीय वसतीगृह, किलेअर्क येथे व विद्यार्थींनीनी अर्जांची प्रिंटप्रत 1000 मुलींचे शासकीय वसतीगृह, युनिट – 4, सौभाग्य मंगल कार्यालय,एन – 11, द्वाराक नगर येथे सादर करावे, व गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृहासाठी भरलेल्या अर्जाची प्रिंटप्रत गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृह (नवीन), रेल्वे स्टेशन रोड येथे सादर करावे. व गुणवंत मुलींचे शासकीय वसतीगृहासाठी भरलेल्या अर्जांची प्रिंटप्रत गुणवंत मुलींचे शासकीय वसतीगृह (नवीन), पद्मपुरा येथे सादर करणे आवश्यक राहील. तालुका स्तरावरील अर्जांची प्रिंटप्रत तालुकास्तरावरील वसतीगृहात सादर करणे. असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे.

गृहपाल अतिश ससाने, मो.क्रं. 9527356486, 1000 मुलांचे शासकीय वसतीगृह Unit – 1 किलेअर्क,

गृहपाल संजय पवार, मो.क्रं. 9096834776, 1000 मुलांचे शासकीय वसतीगृह Unit – 2 किलेअर्क,  

गृहपाल आझाद शेजुळ मो.क्रं.9975434850, गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृह (नवीन),

गृहपाल श्रीमती वैशाली बागल मो.क्रं.9923795054, गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृह (नवीन) पद्मपुरा,

गृहपाल श्रीमती करुणा घनसावंत मो.क्र.1000 मुलींचे शासकीय वसतीगृहृ, युनिट -4,

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा