जिल्हाधिकारी कार्यालयात जनसंवाद कक्ष

 छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या विविध अभ्यागतांच्या समस्यांचे व तक्रारी, गाऱ्हाण्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जनसंवाद कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून त्यासाठी तीन कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आदेश निर्गमित केले असून दररोज (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) दुपारी ३ ते ५ या वेळेत हा कक्ष कार्यान्वित असेल. नियुक्त कर्मचारी  हे नागरिकांचे म्हणणे ऐकून त्यांच्या तक्रारींची सोडवणूक कशी होईल याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करतील. त्यांच्या तक्रारींची नोंद घेतील. संबंधित अधिकाऱ्यांशी मोबाईल द्वारे चर्चा घडवून आणतील. या कक्षात नायब तहसिलदार संभाजी थोटे, सहायक महसूल अधिकारी श्रीमती सोनाली देहाडे, महसूल सहायक दिनेश मेघमाळे  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ह्या कर्मचाऱ्यांनी क्यु आर कोड वर आलेल्या तक्रारी, तक्रार पेटीत जमा झालेल्या तक्रार यांचीही नोंद घेऊन त्याबाबत कार्यवाही करावयाची आहे, असे आदेशात नमूद केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा