१० वी, १२ वी परीक्षा; मनाई आदेश लागू
छत्रपती संभाजीनगर, दि.२३ (जिमाका) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता १० वी व १२वी च्या परीक्षा २४ जून ते १६ जुलै या कालावधीत होणार आहेत. परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडाव्या यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी प्रवीण फुलारी यांनी मनाई आदेश जारी केले आहेत.
भारतीय नागरिक सुरक्षा
संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी प्रवीण फुलारी यांनी मनाई
आदेश जारी केले आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्र व त्या सभोवतालच्या १०० मीटर
परिसरात परीक्षार्थी, परीक्षेसाठी नेमलेले
कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी वगळून अन्य कुणाही
व्यक्तिस प्रवेश करण्यास, परीक्षा केंद्र परिसरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त
व्यक्तिंना एकत्र येण्यास , झेरॉक्स दुकाने सुरु ठेवण्यास, सार्वजनिक टेलिफोन,
एसटीडी बुथ, आयएसडी बुथ, फॅक्स केंद्र परीक्षा कालावधीत सुरु ठेवण्यास मोबाईल,
वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, रेडीओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप इ. जवळ बाळगण्यास मनाई
करण्यात आली आहे. हे आदेश दि.२४ जून ते दि.१६ जूलै या कालावधीत अंमलात राहतील असे आदेशात
म्हटले आहे.
०००००
Comments
Post a Comment