‘छत्रपती संभाजीनगरःपर्यटन’, कॉफीटेबल बुकचे पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते विमोचन

 



छत्रपती संभाजीनगर, दि.१२ (जिमाका)-जिल्हामाहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘छत्रपती संभाजीनगरः पर्यटन’ या कॉफी टेबल बुकचे विमोचन आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा नियोजन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. इमाव, अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, लोकसभा सदस्य खा. संदिपान भुमरे, खा.डॉ. कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आ. विक्रम काळे,आ.राजेश राठोड, आ. संजय केणेकर, विधान सभा सदस्य आ. प्रदीप जयस्वाल, आ. प्रशांत बंब, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजना जाधव, आ. विलास भुमरे तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती, तसेच कला, संस्कृती, खाद्यसंस्कृती अशा विविध वैशिष्ट्यांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा