अल्पवयीन मुलगा बेपत्ता
छत्रपती संभाजीनगर, दि.6 (जिमाका) – वसंतराव नाईक बालक आश्रम, मुंकदवाडी येथील आश्रम शाळेत वास्तव्यास असणारा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार फियार्दी मयुर देशपांडे यांनी पोलीस ठाणे मुकंदवाडी येथे नोदंवली आहे. फिर्यादीनुसार बाल कल्याण समिती यांच्या आदेशाने मुलगा नदीम शहा सलीम शहा (वय 10 वर्षे) रा.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जवळ, घाटी हा बेपत्ता झाला आहे.बेपत्ता बालकाचे वर्णन नाव – नदीम सलीम शहा, वय 10 वर्षे रा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जवळ, घाटी, रंग - सावळा, बांधा – मध्यम, केस – काळे साधे, डाव्या दंडावर तिळ, अंगात लाल रंगाचे टि शर्ट व निळ्या रंगाचे पँट घातलेली वरील वर्णनाचा मुलगा आढळल्यास त्वरीप पोलीस ठाणे मुकुंदवाडी येथे पोलीस उपनिरीक्षक एस.जी. घोरपडे यांच्याशी सपंर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment