जिल्हा नियोजन समितीसमोर जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमांचे सादरीकरण
छत्रपती संभाजीनगर, दि.१२ (जिमाका)-जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. या सर्व उपक्रमांचे जिल्हा नियोजन समितीसमोर आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सादरीकरण करुन माहिती दिली.
राज्याचे
सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इमाव, अपारंपारिक
उर्जा मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राज्यसभा
सदस्य खा. डॉ. भागवत कराड, लोकसभा सदस्य खा. संदिपान भुमरे, खा.डॉ. कल्याण काळे,
विधान परिषद सदस्य आ. विक्रम काळे,आ.राजेश राठोड, आ. संजय केणेकर, विधान सभा सदस्य
आ. प्रदीप जयस्वाल, आ. प्रशांत बंब, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजना जाधव, आ. विलास
भुमरे तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
अंकित, पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा
नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
या
सादरीकरणात जिल्हाधिकारी स्वामी यांनी फेरफार अदालत, अभ्यागतांसाठी केलेल्या सुविधा,
ई- ऑफिस, रस्ते अदालत, शून्य प्रलंबितता, तक्रार पेटी, क्यू आर कोड द्वारे तक्रारी
स्विकारणे, जनसंवाद कक्ष, तक्रार निवारण दिवस, उद्योजकांशी चर्चा, शिक्षण
क्षेत्रातील दशसुत्री, युवा संवाद, महिला सक्षमीकरण अभियान, जलसमृद्ध गाव अभियान,
गाव तेथे वड अभियान, बालहक्क संरक्षणाची पंचसुत्री, गाव तेथे वृक्षारोपण अशा विविध
उपक्रमांची माहिती दिली. अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविल्याबद्दल समितीने त्यांचे
अभिनंदन केले.
०००००

Comments
Post a Comment