दिव्यांग बालकांच्या तपासणीचा पायलट प्रकल्प, १४४ बालकांची तपासणी

 


 छत्रपती संभाजीनगर, दि. २४(जिमाका) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ‘घाटी’ येथे शनिवारी (दि.२१) बालकांच्या दिव्यांगत्व तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १४४ दिव्यांग बालकांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे हा पायलट प्रकल्प राबविण्यात आल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई,  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर, दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगत्वाचे निदान व तपासणी शिबिराचे आयोजन शनिवारी (दि.२१) जिल्हा रुग्णालय घाटी येथील बाह्य रुग्ण विभाग येथे करण्यात आले.

             उद्घाटन सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वैशाली प्रशांत फडणीस यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे, अधीक्षक श्रीमती गायत्री तळवडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.जितेंद्र डोंगरे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्रीमती रेशमा चिमंद्रे, समाज कल्याण प्रादेशिक दिव्यांग उपायुक्त दीपक खरात यावेळी उपस्थित होते.

शिबिरात १४४ दिव्यांग बालकांनी तपासणी करण्यात आली. त्यात अस्थिव्यंग – २७, मानसोपचार – ४५, कान नाक व घसा – २०, बालरोग - ३९, नेत्र - १३ यांचा समावेश आहे. यापैकी ३ बालकांना शिबिरातच दिव्यांग विशेष ओळखपत्र (UDID) देण्यात आले, तर ३७ बालकांची UDID प्रक्रिया पुढील आठवड्यात पूर्ण करण्यात येणार आहे. उर्वरित बालकांना पुढील तपासणीसाठी बोलावण्यात आले आहे,असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा