सैनिक कल्याण विभागाचे पोर्टल; माजी सैनिक, विधवा, वीर माता, पिता यांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका) – सैनिक कल्याण विभाग, केंद्रीय सैनिक बोर्ड, सैनिक कार्यालय अशा सर्व ठिकाणी ऑनलाईन कार्यपद्धतीचा अवलंब होत असल्याने जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरनारी, वीर माता, वीर पिता, अवलंबित यांनी आपली माहिती सैनिक कल्याण विभागाच्या पोर्टलवर भरावी,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

            सैनिक कल्याण विभागाच्या पोर्टलवर नोंद करुन अर्ज व अपलोड केलेल्या सर्व संबंधित कागदपत्राची प्रत व दोन (2.5X2.00CM) साईजचे लाल पार्श्वभूमी असलेले फोटो जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे आणून देणे अनिवार्य आहे.

ऑनलाईन नाव नोंदणी www.mahasainik.maharashtra.gov.in  संकेतस्थळावर करावी. अधिक माहितीसाठी ०२४०- २३७०३१३ या क्रमांकावर संपर्क करावा.

०००००

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा