महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (MCED) तर्फे 'इम्पोर्ट एक्सपोर्ट' प्रशिक्षण

 छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका) –    महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे दोन दिवसीय निर्यात आयात प्रशिक्षणाचे आयोजन दि.१० व ११ जून  रोजी करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात एक्सपोर्ट ची प्राथमिक माहिती, एक्सपोर्ट संधी, एक्सपोर्ट फायनान्स, एक्सपोर्ट चे प्रकार, एक्सपोर्ट प्रक्रिया, एक्सपोर्ट व्यवसाय कसा सुरू करावा, शासकीय योजना, एक्स्पोर्ट लॉजिस्टिक, शीपिंग डॉक्युमेंट्स, इम्पोर्ट प्रक्रिया, ओव्हरसीज एजंट कमिशन, विविध देशांचे निकष या विषयावर तज्ञ व्याख्याते मार्गदर्शन करतील याबरोबरच एफ टी सी भारताचे विविध देशाबरोबर होत असलेले व्यापार करार, भारताचे आयात निर्यात विषयक धोरण, भारत सरकारच्या निर्यात पूरक योजना, कोविड नंतर आयात निर्यात व्यवसायाला निर्माण होणाऱ्या नवीन व्यवसाय संधी इत्यादी विषयावर  तज्ञ व्याख्यात्याकडून मार्गदर्शन होणार आहे. ज्यांना आयात - निर्यात क्षेत्रात उद्योग व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे. व अचूक मार्गदर्शन ची गरज आहे. त्यांनी अधिक माहितीसाठी सौ आशा कुरवाडे, कार्यक्रम आयोजक, एम.सी.ई.डी. मो.- ७८८८०७०४१९ तसेच प्रतिभा निमकर, जिल्हा प्रकल्प समन्वयक, एम.सी.ई.डी. छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन श्री.सुदाम थोटे,   विभागीय अधिकारी, एम.सी.ई.डी., छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व प्रत्यक्ष भेटीसाठी जिल्हा कार्यालय - महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र(एम.सी.ई.डी.), ए-३८  रेल्वे स्टेशन एमआयडीसी एरिया, रेल्वे स्टेशन रोड जवळ, छत्रपती संभाजी नगर येथे संपर्क करावा.

००००००

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा