शेतकऱ्यांसाठी विदेशात अभ्यास दौरा; अर्ज मागविले

 


छत्रपती संभाजीनगर,दि.२१(जिमाका)- विदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजीत करण्यात येणार आहेत. सन २०२५-२६ साठी राज्य पुरस्कृत या योजनेत युरोप (नेदरलॅण्ड, जर्मनी, स्वित्झरलॅंड, फ्रान्स), इस्त्राईल, जपान, मलेशिया (व्हिएतनाम व फिलिपाईन्स), चीन व कोरिया या देशांचा समावेश आहे. स्न २०२५-२६ या आर्थिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून पाच  शेतकऱ्यांचा लक्षांक आहे. त्यात एक महिला शेतकरी, एक केंद्र/ राज्य कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी व पीक स्पर्धा विजेता शेतकरी  आणि इतर तीन शेतकरी आहेत.

            पात्रतेचे निकष:शेतकरी हा स्वतःच्या नावावर शेती असलेला, नियमित शेती करणारा, उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असलेला असावा. वय २५ ते ६० वर्षांदरम्यान असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी स्वतः उत्पादनात उल्लेखनीय कामगिरी केलेली असावी आणि शेतीविषयक नव्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली असावी.शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे व वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शासकीय/निमशासकीय/खाजगी नोकरी करत असलेले अर्जदार पात्र ठरणार नाहीत.तसेच डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार इऩसावा. शेतकऱ्यांनी यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून विदेश दौरा केलेला नसावा. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त एक लक्ष रुपये यापैकी जी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी मार्गदर्शक सुचना व विहित नमुन्यातील अर्ज तातडीने आपले तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातून प्राप्त करावा व संपूर्ण भरलेला अर्ज तातडीने येत्या आठ दिवसात तालुका कृषी कार्यालयाकडे सादर करावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा