शिक्षण विभागाची जिल्हास्तरीय आढावा बैठक: गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर,दि.१८(जिमाका)- शिक्षकांनी आपापल्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन,अंक क्षमतांसोबतच निसर्गप्रेम, सुसंस्कार देऊन गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आदींना दिले.
शिक्षण
विभागाची जिल्हास्तरीय आढावा बैठक आज देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर
सभागृहात पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, जिल्हा
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आश्विनी
लाटकर, जिल्हा शिक्षणाधिकारी (योजना) अरुण शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत
वायाळ तसेच जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी,
केंद्रप्रमुख आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
स्वामी म्हणाले की, जिल्ह्यात दशसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुसंस्कारित
करण्याचा उपक्रम गेल्या वर्षी सुरु केला. या उपक्रमाला चालना द्यावी. त्यासाठी
प्रत्येक पालकांशी संवाद साधणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी, शिक्षक
आणि पालक हे तीन घटक सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. प्रशासन हा या सर्व घटकांना मदत
करण्यासाठी सज्ज असायला हवा. शिक्षकाने आपल्या कर्तव्यात हयगय केल्यास पिढ्यांचे
नुकसान होऊ शकते. त्यामुळे शिक्षण हा व्यवसाय नसून ते एक पवित्र कर्तव्य आहे.
आपल्या देशाचे भावी नागरिक घडविण्यासाठी शिक्षकांनी अथक प्रयत्न करावेत, असे
आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत म्हणाले की,शिक्षण विभागाच्या प्रशासनातील
अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत
अहवाल द्यावा. शासनाच्या विविध ॲपद्वारे अहवाल द्यावयाचे असतात. त्याबाबत अधिक तत्पर
रहावे. शाळा पाहणी दरम्यान काही विद्यार्थी हे अभ्यासात मागे असल्याचे निदर्शनास
आल्यास त्यांच्यासाठी विशेष वर्गांचे आयोजन करुन त्यांच्या अभ्यासात सुधारणा करुन
घ्यावी,असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हा
नियोजन अधिकारी वायाळ यांनी विकसित महाराष्ट्र २०४७ सर्व्हेक्षणाबाबत सादरीकरण
करुन सर्वांना सहभागाचे आवाहन केले.
जयश्री
चव्हाण यांनी प्रास्ताविक केले तर आश्विनी लाटकर यांनी आभार मानले.
०००००
Comments
Post a Comment