ज्येष्ठांच्या मदतीसाठी १४५६७ हेल्पलाईन

 छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका)- सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ राष्ट्रीय हेल्पलाईन ही सेवा सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात वयोवृद्धांसाठी सुरू करण्यात आली आहे.

ऑगस्ट २०२१ पासून सुरू झालेल्या या हेल्पलाईनवर आतापर्यंत ४ लाखांहून अधिक कॉल्स आले असून ३० हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर मदत करण्यात आली आहे.

हेल्पलाइनद्वारे मिळणाऱ्या मोफत प्रमुख सेवा:

·         माहिती: आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृह व वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, याबाबत माहिती.

·         मार्गदर्शन: कायदेविषयक, मालमत्ता व कौटुंबिक वादांमध्ये मोफत कायदेशीर सल्ला, पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम २००७.

·         भावनिक आधार – मानसिक आजार व चिंता, ताण, राग इत्यादी व्यवस्थापन.

  • बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांसाठी मदत आणि पुनर्वसन, कुटुंबीयांशी संवाद, पोलिस प्रशासनाशी समन्वय, समुपदेशन.

ज्येष्ठांसाठी असलेल्या १४५६७ या हेल्पलाईन सेवेचा वृद्ध नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा